मुंबईकरांचा प्रामाणिकपणात नंबर दुसरा !

September 26, 2013 8:06 PM0 commentsViews: 1052

mumbai kar26 सप्टेंबर : मुंबईत एखाद्या रिक्षावाल्यानं किंवा टॅक्सी ड्रायव्हरनं हरवलेल्या वस्तू त्याच्या मालकांना परत करण्याच्या घटना आपल्याला माहीत आहेत. पण मुंबईकरांचा हा प्रामाणिकपणा आता जगभरातही सिद्ध झाला आहे.

 

रिडर्स डायजेस्टनं केलेल्या सर्व्हेनुसार जगभरात प्रामाणिकपणामध्ये हेलसिंकीनंतर आपल्या मुंबईचा नंबर लागतो. रिडर्स डायजेस्टनं या सर्व्हेसाठी मुंबईतल्या गजबजलेल्या ठिकाणी, शॉपिंग मॉल्समध्ये पैशांची 12 पाकिटं टाकली.

 

या पाकिटांत 3 हजार रुपये, मोबाईल नंबर, बिझनेस कार्ड, फॅमिली फोटो ठेवले होते. या 12 पाकिटांपैकी मुंबईकरांनी 9 पाकिटं मालकांशी संपर्क साधून परत केली. तर हेलसिंकीकरांनी 12 पैकी 11 पाकिटं मालकांना परत केली. या सर्व्हेनुसार सगळ्यात अप्रामाणिक लोक हे पोर्तुगलमधल्या लिस्बनमधले असल्याचही निदर्शनास आलंय.

close