मतदारच राजा, नकाराधिकार मिळाला !

September 27, 2013 4:47 PM1 commentViews: 894

right to vote27 सप्टेंबर : नगरपालिका, महापालिका निवडणुका असो, लोकसभा अथवा विधानसभेच्या निवडणुका असो यात मतदार राजाची वट असते. पण आता मतदार राजाला सुप्रीम कोर्टाने आणखी एक अधिकार देऊ केला आहे.

 

सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवर हा ऐतिहासिक निर्णय दिला. हा निर्णय देत असतांना सुप्रीम कोर्टाने नकाराधिकारचं एक बटन इव्हीएम मशीनमध्ये ठेवा असे आदेशही दिले आहे. तसंच कोर्टाने ‘वरीलपैकी कुणीही नाही’ या पर्यायाचं एक बटण इव्हीएम मशीनमध्ये ठेवा असंही सांगितलं. शिवाय असं मतदान करणार्‍या मतदाराची ओळखही गुप्त ठेवण्याची सूचना कोर्टाने केलीय. यामुळे यंत्रणेतले दोष दूर करण्यासाठी मदत होईल, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय.

 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाच्या आंदोलनाच्या वेळीच ही मागणी लावून धरली होती. जर एखादा उमेदवार तुम्हाला आवडला नाही तर त्याच्या विरोधात आता मतदान करता येणार आहे. एकीकडे गुन्हेगार लोकप्रतिनिधींच्या बचावासाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय पायदळी तुडवून लोकप्रतिनिधींची खुर्ची भक्कम केली जातेय. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने आज दिलेला निर्णय सरकारला धक्का आहे.

 

नकाराधिकारामुळे काय घडेल ?
– उमेदवारापैकी तुम्हाला कुणालाही मत द्यायचं नसेल तर ते तुम्ही करू शकता.
– त्यासाठी वरीलपैकी कुणी नाही अशा पर्यायाचं बटण EVM मशीनमध्ये असेल
– पण, या मतदानाचा निवडणूक निकालावर काहीही परिणाम होणार नाही.
– बहुसंख्य मतदारांनी नकारात्मक मत दिलं तरीही निवडणुकीचा निकाल बदलणार नाही.
– ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली असतील, तोच निवडून येईल

  • Ravirao Ghogare Patil

    MILALA NAHI AJUN, SHAKTO.. MILAALA TAR PUDHIL ELECTONS SATHI, 2014 SATHI ASHAKYA..JANATA PATKAN HURALTE, VICHAR KARU DYA , JANMAT GHYA MAG CHAPA..

close