कसाबच्या पोलीस कोठडीत वाढ

February 2, 2009 6:46 AM0 commentsViews: 2

2 फेब्रुवारी, मुंबईमुंबई दहशतवादी हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाबच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कसाबची 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव क्राईम ब्रँचमध्येच सुनावणी करण्यात आली.कसाबवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील कुबेर या जहाजाचं 26/11 तील अतिरेक्यांनी अपहरण करून जहाजाच्या तांडेलाची हत्या केली होती. याप्रकरणी पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडला गेलेला कसाब हा एकमेव जिवंत अतिरेकी आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीतून अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्या आधारावर पाकिस्तानचा या हल्ल्यातील सहभाग स्पष्ट होत आहे. त्यामुळेच कसाबच्या जीवाला धोका असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर कसाबला कडोकोट सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली असून बंद कोठडीत त्याची सुनावणी करण्यात येत आहे.

close