सॅफ्रॉन टूर्स कंपनीचा रत्नागिरीकरांना कोट्यावधीचा गंडा

September 27, 2013 9:18 PM0 commentsViews: 112

safroon27 सप्टेंबर : रत्नागिरीतल्या सॅफ्रॉन या टूर्स आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीनं रत्नागिरीकरांना कोट्यवधीचा गंडा घातलाय. इंटरनॅशनल टूर्स आणि लॅन्ड इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली शेकडो जणांकडून हॅन्ड लोन म्हणून या कंपनीने लाखो रुपये गोळा केले.

 

त्यासाठी गुंतवलेली रक्कम तीन ते सहा आठवड्यात 9 पट करण्याचं आमिषही या गुंतवणूकदारांना दाखवण्यात आलं. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या कंपनीचा संचालक शशिकांत राणे गुंतवणूकदारांना गुंगारा देतोय. त्यामुळे हे सगळे गुंतवणूकदार संतप्त झाले आहे.

close