राजेश क्षीरसागरांचा जामीन अर्ज फेटाळला

September 27, 2013 9:24 PM0 commentsViews: 327

rajesh shirsagar27 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळलाय. त्यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. शहरात गणेश विसर्जानाच्या मिरवणुकीतील गोंधळ प्रकरणी क्षीरसागर यांना काल अटक झाली होती. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते.

 

राजेश क्षीरसागर यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी शहरातल्या पापाची तिकटी परिसरात खंडोबा तालीम मंडळ, शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात वादावादी होऊन त्यानंतर हाणामारीही झाली होती.

 

गणेश मंडळांनी मिरवणूक रेंगाळात ठेवल्यानं पोलिसांनी मंडळांना पुढ जाण्याचं आवाहन केलं होतं. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्याचवेळी आमदार क्षीरसागर यांनी पोलिसांबरोबर हुज्जत घातली होती. या सर्व धुमश्चक्रीमध्ये 6 पोलीस आणि 8 कार्यकर्तेही जखमी झाले होते. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणणं आणि विनयभंग प्रकरणी आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

close