ठाण्यात राजीव गांधी कॉलेजमध्ये रॅगिंग

September 27, 2013 9:33 PM0 commentsViews: 588

thane raging27 सप्टेंबर : ठाण्यात राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पाच सीनिअर विद्यार्थ्यांनी कॉलेजमधल्या ज्युनिअर विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याचा प्रकार उघड झालाय. यातल्या एका विद्यार्थ्याला मारहाण करुन त्याच्यावर चाकूनं वारही करण्यात आले.

 

गुरूवारी रात्री तब्बल दोन तास हा प्रकार सुरु होता. पीडित विद्यार्थ्यांनी कळवा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर रँगिग करणार्‍या 5 सीनिअर विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आलंय.

close