रुपी बँकेच्या खातेदारांना दिलासा

September 27, 2013 9:35 PM0 commentsViews: 272

Image img_231152_rupibank_240x180.jpg27 सप्टेंबर : अडचणीत आलेल्या रुपी बँकेच्या खातेदारांना दिलासा देत फेब्रुवारी 2014 च्या आत बँकेचं विलीनकरण होईल अशी ग्वाही सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी दिलीय.

 

थकित कर्जांच्या रकमेमुळे 22 फेब्रुवारीपासून रूपी बँकेवर रिजर्व्ह बँकेनं आर्थिक निर्बंध घातले आहे. सारस्वत बँकेनं विलीनकरण करून घेण्याकरता तयारी दर्शवलीय. तर रूपी बँकेच्या प्रशासकांनीही नवा प्रस्ताव दिलाय.

 

यावर विचार विनिमय सुरू आहे अशी माहिती प्रशासकीय अधिकारी विद्याधर अनास्कर यांनी दिलीय. बँकेच्या खातेदारांचे पैसे बुडणार नाहीत, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

close