दिल्ली-गोवा विमानातील संशयिताला कोर्टात हजर करणार

February 2, 2009 7:38 AM0 commentsViews: 5

2 फेब्रुवारी, दिल्लीगोव्याहून दिल्लीला जाणार्‍या इंडिगो फ्लाईटच्या विमानात संशयास्पद वर्तन करणार्‍या तिघांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी दोघांना सोडून देण्यात आलं आहे तर दारूच्या नशेत असभ्य वर्तन करणार्‍या जितेंद्र मोहला नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जितेंद्रला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.तीन प्रवाशांच्या संशयास्पद हालचालीनंतर दिल्ली एअरपोर्टवर विमानाचं अचानक लँडीग करावं लागलं होतं. त्यानंतर या विमानाला दिल्ली विमानतळावर एका बाजूला नेण्यात आलं. एनएसजी आणि दिल्ली पोलिसांनी तात्काळ विमानाचा ताबा घेतला. BSF च्या विमानांनाही हाय ऍलर्टचा इशारा देण्यात आलाय. या विमानाचं अपहरण झाल्याचा संशय सुरवातीला व्यक्त केला जात होता. पण विमानाचं अपहरण झालं नसल्याचं सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केलं. विमानातल्या एका प्रवाशानं संशयास्पद वर्तन केल्याचं पायलटनं सांगितल्यानंतर विमान लँड करण्यात आलं.

close