डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 50 वर

September 28, 2013 5:58 PM0 commentsViews: 833

dockyard bulding28 सप्टेंबर : मुंबईतल्या डॉकयार्ड इमारत दुर्घनटनेतल्या मृतांची संख्या आता 50 झाली आहे. तर 32 जण जखमी झालेत. जखमींवर जेजे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुर्घटनेच्या दुसर्‍या दिवशीही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 56 लोकांना ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आलंय.

 

अजूनही काही जण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती आहे. या दुर्घटनेत एकाच घरातील सातजण ठार झालेत. त्यात पत्रकार योगेश पवार यांचाही मृत्यू झालाय. या प्रकरणी इमारतीच्या तळमजल्यावरचा डेकोरेटर अशोक मेहताला अटक करण्यात आली आहे.

 

इमारतीच्या तळमजल्यात बदल केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात शिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संपूर्ण परिसरात शोककळा पसरलीय.

close