श्रीनगरजवळ लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार

September 28, 2013 3:31 PM0 commentsViews: 399

shrinager firing28 सप्टेंबर : जम्मूमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आज श्रीनगरमध्ये दोन अज्ञात तरूणांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडलीय. श्रीनगरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या संतनगरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार झालाय.

 

स्कूटरवरून आलेल्या दोन तरुणांनी ताफ्यावर गोळीबार केला आणि पसारा झाले. यात एक जण काच लागल्यानं जखमी झालाय. यामुळे काही वेळ संतनगरमधल्या हायवेवरची वाहतूक थांबवली होती पण आता वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आलीये. या घटनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

 

घटनास्थळी सैनिकांनी धाव घेतली असून परिसरात जवान तैैनात करण्यात आले आहे. आज सकाळी सांबा सेक्टरजवळ तीन अतिरेकी दिसल्याची माहिती सैन्याला मिळाली होती या नंतर सैन्यानं शोध मोहिम सुरू केलीय. सुरक्षा दलाने नॅशनल हायवे बदं केलाय. मात्र हा गोळीबार करणार अतिरेकी होते का हे स्पष्ट झालं नाही.

 

अमेरिकेत होणार्‍या परिषदेत पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट होणार आहे. ही भेटीचा विरोध करण्यासाठी अतिरेक्यांनी जम्मूत गोळीबार केला होता. आज ही भेट काही तासांवर येऊन ठेपली असताना पुन्हा एकदा श्रीनगरमध्ये गोळीबाराची घटना घडलीय.

close