मुंबईत गे-रेव्ह पार्टी उधळली, 35 जण ताब्यात

September 28, 2013 1:08 PM0 commentsViews: 1553

mumbai gay party28 सप्टेंबर : मुंबईतल्या ओशिवरा इथं एका पबमध्ये सुरू असलेल्या गे पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यात 31 पुरुष आणि चार महिलांना ताब्यात घेण्यात आलंय. यात एका अमेरिकन आणि जर्मन नागरिकांचाही समावेश आहे.

 

या ठिकाणी गे पार्टी होणार असून त्यात अंमली पदार्थांचा वापर होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री पबवर धाड टाकली यावेळी मद्यधुंद अवस्थेत अवस्थेत धांगडधिंगा सुरू असल्याचं आढळून आलं.

 

पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलंय त्यांची वैद्यकीय चाचणीसाठी कुपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

close