सत्यम खरेदीसाठी स्पाईस ग्रुपची ऑफर

February 2, 2009 8:15 AM0 commentsViews: 4

2 फेब्रुवारीलार्सन अँड टूब्रो, एस्सार ग्रुपनंतर आता सत्यम खरेदी करण्यासाठी बी.के.मोदी यांच्या स्पाईस ग्रुपनंही उत्सुकता दाखवली आहे. स्पाईस ग्रुपनं नेमक्या किती रकमेची ऑफर दिलीय हे समजू शकलेलं नाही, पण मोदी यांनी सत्यम खरेदी करण्यासाठी स्पाईस ग्रुपकडे पुरेसा बँकबॅलन्स असल्याचं सांगितलं आहे.सत्यम कंपनी खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या कंपन्यांना यापुढं सत्यमच्या नव्या बोर्ड सदस्यांची आणि सरकारच्या मंजूरीची गरज लागणार आहे. सध्या सत्यमची अंदाजे किंमत दोन हजार कोटी रुपये सांगितली जातेय आणि दोनशे साठ रुपये प्रति शेअर अशा दरानं बोली सुरू केली जाऊ शकते. दरम्यान सत्यम प्रकरणातलं आणखी एक ताजी खबर म्हणजे म्हणजे सेबीनं सत्यमच्या विरोधात आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

close