नांदेडमध्ये हत्ती रोगाचं थैमान सुरूच, 3 हजार 700 रुग्ण आढळले

September 28, 2013 5:53 PM0 commentsViews: 883

28 सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यात हत्तीपाय रोगाचं थैमान सुरुच आहे. जिल्ह्यात या रोगाचे 3,700 पेक्षा जास्त रुग्ण आहेत आणि या रोगाची लक्षणं दिसून आलेल्या रुग्णांची संख्या जवळपास 6300 इतकी आहे. पण गेल्या वर्षभरापासून क्युलेक्स आणि फेसीयेटंस डासांच्या नियंत्रणासाठी फवारणी औषधांचा पुरवठाच झाला नाही असा आरोप रोग नियंत्रणाचं काम करणार्‍या आधिकार्‍यांनीच केलाय. फक्त प्रतिबंधात्मक गोळ्या देण्यापलीकडे काहीही होत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. जिल्ह्यात आठ ठिकाणी हत्तीपाय रोगाचे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. पण रुग्णांच्या संख्येत वाढ होतेच आहे. सर्वाधिक रुग्ण बिलोली तालुक्यात 535 रुग्ण तर देगलूर 450, मुखेड 423, भोकर 385, नायगाव 393 आणि कंधारमध्ये 300 रुग्ण आढळून आले.

close