पोलीस करताय जीव मुठीत धरून काम !

September 28, 2013 9:34 PM0 commentsViews: 471

28 सप्टेंबर : मुंबईत इमारत कोसळण्याच्या घटना सुरुच आहेत. शहरात जशा रहिवाशी इमारती धोकादायक आहेत, तशाच सरकारी कार्यालयांच्या इमारतीसुद्धा धोकादायक बनल्यात. त्यातलीच एक इमारत म्हणजे कुर्ला रेल्वे स्टेशनची इमारत.. ही इमारत पडण्याच्या बेतात असून तीला आधारासाठी ठिकठिकाणी टेकू लावण्यात आलाय. या पोलीस स्टेशनमध्ये 250 कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करता आहे. पोलीस स्टेशनच्या भिंतींना तडे गेलेत तर सिलींग चा भाग देखील कोसळतोय. या इमारतीची दुरुस्ती व्हावी अशी वारंवार मागणी करुन ही याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

close