श्रीनिवासन BCCI च्या अध्यक्षपदी बिनविरोध?

September 28, 2013 10:31 PM0 commentsViews: 82

Image n_shrinivasan_300x255.jpg28 सप्टेंबर : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी एन श्रीनिवासन यांची पुन्हा एकदा वर्णी लागण्याचा मार्ग जवळपास मोकळा झालाय. रविवारी चेन्नईत होणार्‍या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वासाधारण सभेत श्रीनिवासन यांची बिनविरोध निवड होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

 

. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदासाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. साऊथ झोनमध्ये 6 पैकी 2 क्रिकेट बोर्डांचा पाठिंबा मिळाल्यानं श्रीनिवासन निवडणूकीसाठी सज्ज झालेत. पण सर्वोच्च न्यायालयानं काल दिलेल्या निकालानुसार श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवडून आले तरी ते पदभार स्विकारु शकत नाहीत.

close