चारा घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

September 30, 2013 5:53 PM2 commentsViews: 1416

Image img_192772_laluprasadyadav_240x180.jpg30 सप्टेंबर :चारा घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी ठरवलंय. त्यांच्यासोबतच एकूण 45 जणांना कोर्टानं दोषी ठरवलं. लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या बड्या नेत्याला दोषी ठरवण्यात आल्यानं राजकारणातलं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा मानला जातोय. कारण आता त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, अशी दाट शक्यता आहे.

 

गेल्या दीड दशकापासून भारतीय राजकारणात रवंथ झालेल्या चारा घोटाळ्याचा अखेर निकाल लागला. एकूण 950 कोटी रुपयांच्या या बिहारमधल्या घोटाळ्यात सीबीआयच्या विशेष कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवलं. या निकालानंतर अर्धा तासातच भारताचे माजी रेल्वे मंत्री आणि छपराचे विद्यमान खासदार असलेल्या लालूंची रवानगी रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात करण्यात आली.

 

चारा पचला नाही!

– चैबासाच्या सरकारी कोषातून अवैधपणे 37 कोटी रुपये काढल्याप्रकरणी लालूंना दोषी ठरवण्यात आलंय
– याशिवाय बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा, माजी मंत्री विद्या सागर निषाद, माजी आमदार धृव भगत यांच्यासह एकूण 44 जणांना दोषी ठरवण्यात आलंय
– भ्रष्टाचारविरोधी कायद्यातल्या कलमांखाली या सर्वांना दोषी ठरवण्यात आलंय
– या प्रकरणी लालू प्रसाद यादवांना 3 ते 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते

 

या प्रकरणात जेडीयूचे, भाजप आणि काँग्रेसचेही नेतेही दोषी आढळलेत. तरीही विरोधकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. 2 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तुरुंगवास झालेल्यांना निवडणूक लढवता येणार नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टाने नुकताच दिलाय. पण, त्याविरोधात केंद्र सरकारनं वटहुकूम काढला. या वटहुकुमाला राहुल गांधींनी विरोध केल्यावर त्यावर मंगळवारी कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. त्यात वटहुकूम मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला, तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लालूंची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल.

लालूंपुढे आता कुठलाच पर्याय नाही. त्यांना खासदारकी सोडावी लागेल आणि त्या जागेवर तात्काळ निवडणूक घेतली जाईल. लालू प्रसादांसह 38 जणांना 3 ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाईल. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनं व्हिडिओ कॉन्फेरेंसिंगद्वारे ही शिक्षा सुनावली जाईल. या खटल्यात 16 वर्षांपूर्वी लालू यादवांनी जामीन मिळवून आपली राजकीय कारकीर्द सुरू ठेवली. पण, सीबीआय कोर्टानं दिलेला हा निकाल त्यांच्या राजकीय कारकिर्दीला जोरदार धक्का मानला जातोय.

 

काय आहे चारा घोटाळा ?
– 1990 च्या सुमाराला बिहारच्या पशुसंवर्धन खात्यातून 950 कोटींचा गैरव्यवहार झाला
– नकली बिलं आणि व्हाऊचर्सच्या मदतीनं बियाणं, चारा खरेदी, तसंच जनावरांच्या खाद्यासाठी हे पैसे काढण्यात आले
– बिहारमधले राजद आणि काँग्रेस त्याचबरोबर JDU आणि भाजपसह सगळ्या पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी मिळून पुरवठा करणार्‍या व्यापार्‍यांशी संगनमत करून हा घोटाळा केला…

 

चारा घोटाळ्याचा घटनाक्रम

 • – जानेवारी 1996मध्ये पशुसंवर्धन खात्याच्या चौबासा कार्यालयावर छापा टाकण्यात आला.
 • – तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी याप्रकरणीे चौकशीचे आदेश दिले.
 • – मार्च 1996 मध्ये पाटणा कोर्टानं प्रकरण सीबीआयकडे सोपवलं.
 • – मे 1997मध्ये सीबीआयनं बिहारच्या राज्यपालांकडे लालूप्रसाद यांची चौकशी करण्याची परवानगी मागितली.
 • – मे 1997मध्ये आरोपी हरीश खंडेलवाल रेल्वे ट्रॅकवर मृत आढळला.
 • – 25 जुलै 1997ला लालूप्रसाद यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
 • – 30 जुलै 1997ला बिहार पोलिसांनी लालूंना अटक केली.
 • – जुलै 1997मध्येच लालूप्रसाद जनता दलातून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली.
 • – एप्रिल 2000मध्ये लालू आणि इतर 55 जणांवर आरोपपत्र निश्चित करण्यात आलं.
 • – 30 सप्टेंबर 2013 म्हणजे आज याप्रकरमी विशेष सीबीआय कोर्टानं निकाल दिला.
 • – कोर्टानं लालूप्रसाद यादवांबरोबर 45 जणांना दोषी ठरवलं.
 • उमेश मुंडले

  यांना जेल मध्ये चारा खायला घाला.

 • Rohan

  Iska pura paisa garibome bat do

close