वन डे सीरिजसाठी युवराज सिंगचं कमबॅक

September 30, 2013 2:18 PM0 commentsViews: 572

Image img_204992_yuvraj_240x180.jpg30 सप्टेंबर :ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या वन डे सीरिजसाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. चेन्नईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली. धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगनं भारतीय टीममध्ये कमबॅक केलंय.

 

जानेवारीत इंग्लंडविरुद्ध झालेल्या वन डे सीरिजमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे युवराजला टीममधून वगळण्यात आलं होतं. पण चॅलेंजर ट्रॉफीमध्ये युवराजने 113 रन्स केले होते. त्याशिवाय त्यानं फिटनेसही परत मिळवलाय.

 

त्याशिवाय अंबाती रायडू आणि जयदेव उनाडकड यांना संघात स्थान देण्यात आलंय. तर दिनेश कार्तिकला टीममधून वगळण्यात आलंय. टी-20 आणि पहिल्या तीन वन डे मॅचसाठी ही निवड करण्यात आलीये. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 1 टी-20 मॅच आणि 7 वन डे मॅच खेळवण्यात येणार असून 10 ऑक्टोबरला टी-20 तर 13 ऑक्टोबरला पहिली वन डे मॅच खेळवली जाणार आहे.

close