सानिया-भूपतीचं उत्साहात स्वागत

February 2, 2009 8:28 AM0 commentsViews: 3

2 फेब्रुवारी, मुंबईऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीचं विजेतेपद पटकावून महेश भूपती आणि सानिया मिर्झाचं आज मुंबईत विमानानं आगमन झालं. त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांचे फॅन्स मोठ्या संख्येनं विमानतळावर उपस्थित होते.एखाद्या भारतीय जोडीनं मिश्र दुहेरीचं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. सहाजिकच भारतीय टेनीसप्रेमी या विजयी जोडीचं स्वागत करायला उत्सुक होतं. भूपती-सानियाचं आगमन होताच त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर काही वेळ त्यांनी आपले फॅन्स आणि पत्रकारांशी काही काळ मनमोकळ्या गप्पा मारल्या.

close