विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका यांचं निधन

September 30, 2013 5:06 PM0 commentsViews: 627

satyanaryan goyenka30 सप्टेंबर : विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका यांचं रविवारी रात्री मुंबईत त्यांच्या अंधेरीच्या राहत्या घरी निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्यावर उद्या सकाळी साडे दहा वाजता जोगेश्वरीमध्ये विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

1969 पासून त्यांनी विपश्यनेच्या माध्यमातून बुद्धांची नैतिक शिकवण आणि शांतीचा प्रसार केला. त्यांनी सुरू केलेला 10 दिवसांचा विपश्यना कोर्स जगभर प्रसिद्ध आहे. भारत सरकारनं त्यांना पद्म भुषण देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलाय.

 
सत्यनारायण गोयंका यांचा अल्प परिचय

– म्यानमारमध्ये जन्म, तिथे यशस्वी उद्योजक म्हणून परिचित
– विपश्यनाचार्य ऊ बा खीन यांच्याकडून 14 वर्षे विपश्यनेचं प्रशिक्षण
– 1969मध्ये भारतात स्थायिक
– विपश्यनेच्या माध्यमातून बुद्धांची नैतिक शिकवण आणि शांतीचा प्रसार
– त्यांनी सुरू केलेला 10 दिवसांचा विपश्यना कोर्स प्रसिद्ध
– भारत आणि भारताबाहेरच्या तुरूंगांमध्ये कैद्यांसाठीही विपश्यनेचा पाठ सुरू
– भारत सरकारतर्फे पद्मभूषण देऊन गौरव

close