पेट्रोल 3.05 रुपयांनी स्वस्त,डिझेल 50 पैशांनी महाग

September 30, 2013 8:15 PM0 commentsViews: 626

Image img_234512_petrolpricelow_240x180.jpg30 सप्टेंबर : एकीकडे निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असतात आज महागाईच्या खाईत होरपळणार्‍या सर्वसामान्यांच्या वेदनेवर केंद्र सरकारने फुंकर मारलीय.

 

पेट्रोल दरात प्रतिलिटर 3.05 रूपयांनी कपात करण्यात आली तर डिझेल 50 पैशांनी महागले आहे ही दरवाढ आणि दरकपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

 

गेल्या दोन महिन्यात आंतराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रूपयाची होत असलेली घसरणीमुळे क्रुड तेलाच्या दरात भडका उडाला होता. यामुळे पेट्रोलच्या दरात ऑगस्टमध्ये 2.35 पैसे आणि सप्टेंबरमध्ये 1.63 पैशांनी पेट्रोल महागले होते. रिझर्व्ह बँकेनं हस्तक्षेप केल्यानंतर रुपयाची घसरण थोड्याप्रमाणावर थांबलीय. यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

close