एका लातूरकराच्या संघर्षाची कहाणी

September 30, 2013 9:10 PM0 commentsViews: 698

हलीमा कुरेशी, पुणे
30 सप्टेंबर : 30 सप्टेंबर 1993 ला लातूरमध्ये भीषण भूकंप झाला. शेकडो लोकांचे जीव गेले. पण जे मागे राहिले त्यांचं आयुष्य नियतीने खडतर बनवलं. आपली माणसं, आपलं सर्वस्व गमावलेल्यांपैकी होता चार वर्षांचा भैरवनाथ लहाटेकर. आज तो IIT बॉम्बेमध्ये सीनिअर वेब डिझायनर म्हणून काम करतोय. जाणून घेऊयात त्याची कहाणी..

लातूरमधल्या विनाशकारी भूकंपानंतर मदतीसाठी शेकडो हात पुढे आले. पुण्यातल्या भारतीय जैन संघटनेच्या शांतीलाल मुथा यांनी आधार हरवलेल्या मुलांचं पुनर्वसन केलं. त्यांना पुण्याजवळच्या वाघोली इथं आणलं. यापैकी एक भैरवनाथही होता. भैरवनाथच्या घरातले आठ जण भूकंपात ठार झाले. आज तो IIT बॉम्बेमध्ये सीनिअर वेब डिझायनर आहे. त्याने तयार केलेल्या लोगोची भारत सरकारने आकाश टॅब्लेटसाठी निवड केली आहे.

मुथा यांच्या प्रकल्पाला वीस वर्ष पूर्ण झालीयेत. आज त्या निमित्ताने रसायनशास्त्रात डॉक्टरेट असलेला महादेव शिंदे, इतिहासाचे प्राध्यापक पद्माकर गोरे, नाशिक महापालिकेत केंद्रप्रमुख असलेला ईश्वर चव्हाण एकत्र आले होते. आणि आज शांतीलाल मुथा 1200 मुलांचे मायबाप होऊन त्यांची काळजी घेतायत. शांतिलाल मुथा यांच्या प्रकल्पाने खर्‍याअर्थाने या मुलांना स्वतःच्या पायावर उभं केलंय.

close