ठाण्यात जिम, 10 गाड्या जाळल्या

September 30, 2013 9:14 PM0 commentsViews: 141

thane jakpol30 सप्टेंबर : दुचाकी गाड्या जाळण्याचे नाशिक शहरातलं लोण आता ठाण्यातही पसरल्याचं दिसून येतंय. रविवारी मध्यरात्रीनंतर 3:30 च्या सुमारास ठाण्याच्या रघुनाथनगर, हाजुरी, गिलानी वाडी या परिसरात 10 दुचाकी गाड्या जाळण्यात आल्या.

 

त्याचबरोबर एका व्यायमशाळेलासुद्धा आग लावण्यात आली. यात कोणीही जखमी झाले नाही. पण मोठी वित्तहानी झाली आहे.

 

व्यायामशाळेतलं सर्व सामान जळून खाक झालंय. वागळे इस्टेट पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व अज्ञात इसमांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

close