महिलांना आरक्षणाची गरजच काय?- राज

September 30, 2013 10:05 PM0 commentsViews: 4102

30 सप्टेंबर : आज महिलांना 20 टक्क्यांवरून 50 टक्के आरक्षण देण्यात आलं पण मला मुळात आरक्षण हा शब्दच आवडत नाही. महिला जर सक्षम आहे तर महिलांना कसलं आलंय. जगात दोनच जाती आहे एक आहे पुरूष आणि दुसरी स्त्री. जर एकाला आरक्षण दिले तर दुसर्‍याला का नाही त्यामुळे आरक्षण या शब्दाचा तिटकारा आहे असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम पार पडला यावेळी ते बोलत होते. महिला सक्षम आहेत यावर आपला विश्वास असल्याचं ते म्हणाले. आयुष्यात दुसरं काही जमलं नाही म्हणून राजकारणात आलो नाही, असंही त्यांनी सांगितलं.

close