काँग्रेस देशाला लागलेलं ग्रहण -मोदी

September 30, 2013 10:47 PM0 commentsViews: 1062

30 सप्टेंबर : देशाला अनेक प्रकारचे ग्रहण लागले आहे. ही ग्रहण देशाला उद्धवस्त करत आहे. पण आता त्यांचा काळ फार फार आठ महिन्यांचा असून तुम्ही ठरवलं तर हे ग्रहण दूर करता येईल अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी काँग्रेसचं नाव न घेता केली. तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झालीय त्यामुळे रुपया आयसीयूत आहे. या यूपीए सरकारचं कशावरच कंट्रोल राहिलं नाही. यांचं कंट्रोल फक्त सीबीआय आणि इन्कम टॅक्स खात्यावर आहे अशी टीकाही मोदींनी केली. हिर्‍या सारख्या या देशाला पुन्हा एकदा चकाकी देण्याची गरज आहे. ते काम आपल्या सर्वांना करायचंय आणि यापासून आपल्या कुणीही रोखू शकत नाही असंही मोदी म्हणाले. पंतप्रधानपदाचे उमेदवारपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत आले. यावेळी मोदी यांचं आज एअरपोर्टबाहेर त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी डायमंड मर्चंट्स असोसिएशननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर तोफ डागली. यावेळी त्यांची चांदीनं तुला करण्यात आली. दरम्यान, दाऊदशी संबंध असल्याचा आरोप असलेले हिरे व्यापारी आणि फिल्म फायनान्सर भरत शहा हे मोदींच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर कसे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय.

close