राणेंनी घेतली प्रदेशाध्यक्षांची भेट

February 2, 2009 9:16 AM0 commentsViews: 2

2 फेब्रुवारी, मुंबईकाँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नारायण राणे यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे पाऊण तास बंद खोलीत त्यांची चर्चा झाली. गेल्या आठवड्यात दिल्लीला जाऊन आल्यानंतर नारायण राणे यांनी निलंबनाची कारवाई रद्‌द होण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर राणे यांनी पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीविषयी राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

close