मोफत वीजपंपाची योजना कार्यान्वित

February 2, 2009 11:22 AM0 commentsViews: 2

2 फेब्रुवारी सोलापूरकेंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं देशातील दोन कोटी शेतक-यांना मोफत वीजपंप देण्याची कृषीभार व्यवस्थापन योजना कार्यान्वित केली. या योजनेचा शुभारंभ केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यात करण्यात आला. काकासाहेब पुजारी या शेतक-याला वीजपंप भेट देऊन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पामुळे वीजेची बचत होईल अशी आशा सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली असून सहा महिन्यांच्या अभ्यासानंतर ती देशभरात लागू केली जाणार आहे.

close