डॉकयार्ड इमारत दुर्घटनेप्रकरणी 3 अधिकार्‍यांना अटक

October 1, 2013 3:56 PM0 commentsViews: 290

dockyard01 ऑक्टोबर : गेल्या आठवड्यात मुंबईतल्या डॉकयार्ड परिसरात झालेल्या इमारत दुर्घटने प्रकरणी मुंबई महापालिकेनं तीन अधिकार्‍यांना अटक केली आहे. मार्केट विभागाचे इन्पेक्टर जमाल काझी, डेप्युटी सुपरिन्टेंडन्ट बी.एस. चव्हाण आणि असिस्टंट इन्स्पेक्टर राहुल जाधव अशी या अधिकार्‍यांची नावं आहेत.

 

 

शिवडी पोलिसांनी ही कारवाई केलीये. गेल्या आठवड्यात डॉकयार्ड परिसरात इमारत कोसळून 61 जणांना प्राण गमवावे लागले होते याप्रकरणी आता ही कारवाई करण्यात आलीय. या इमारत दुर्घटनेत 61 जणांना बळी गेलाय. या प्रकरणी दोनच दिवसांपूर्वी 7 अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं होतं.

 

डॉकयार्ड इमारत दुर्घटना का घडली याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन शक्यता व्यक्त केल्यात
1) इमारतीचा तळमजला बेकायदेशीरपणे मंडप कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आला होता. बेकायदेशीरपणे बांधकाम करताना त्यानं बीम आणि कॉलम हलवले. यामुळं इमारत कमजोर झाली असावी.
2) इमारतीच्या जवळच इस्टर्न एक्सप्रेस हायवेचं काम सुरू होत. या वेळी पायलिंग करताना हादरे बसून ही 32 वर्षं जुनी इमारत खिळखिळी झाली असावी.
3) 1970 मध्ये जेव्हा ही इमारत बनवली गेली तेव्हा सर्रासपणे निकृष्ट दर्जाचं सिमेंट वापरलं गेलं. या इमारतीच्या बाजूला बांधकामाच्या पुनर्निर्माणाची काम सुरू आहेत. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला असावा
 

close