जखमींकडून उपचारासाठी पैस मागणारे 3 डॉक्टर निलंबित

October 1, 2013 2:59 PM0 commentsViews: 403

nayar hospital01 ऑक्टोबर : डॉकयार्ड इमारत दुर्घटनेतल्या जखमींकडून उपचारासाठी पैसे मागणारे नायर हॉस्पिटलमधल्या तीन डॉक्टर निलंबित करण्यात आले आहे. तर आणखी आठ जणांची चौकशी करण्यात येणार आहे.

 

डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेतल्या जखमींवर मोफत उपचार करण्याचं जाहीर झालेलं असतानाही नायर हॉस्पिटलच्या कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप तायडे, डॉ. सिद्धार्थ आणि डॉ. हाफीजा यांनी जखमींकडे पैसे घेतले. या डॉक्टरांची सहा निवासी वैद्यकीय अधिकारी, एक सहाय्यक प्राध्यापक आणि एक सहायक वैद्यकीय अधिकारी चौकशी करत आहेत. मात्र अशी लाच मागणं हे अत्यंत चुकीचं असल्याची प्रतिक्रिया इथल्या रहिवाशांनी दिलीये.

 

इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना जे.जे.हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यावेळी महापौर सुनील प्रभू यांनी जखमींवर उपचाराचा खर्च महापालिका उचणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदतही जाहीर केली होती. महापालिकेचं उपचाराचा खर्च उचलूनही डॉक्टरांनी खर्च मागितल्यामुळे जखमींच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

close