संजय दत्तची पॅरोलवर 14 दिवसांसाठी सुटका

October 1, 2013 1:47 PM0 commentsViews: 786

sanjay dutt in jail01 ऑक्टोबर : 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणी पुण्यातील येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त पाच महिन्याची तुरूंगवारी करून पॅरोलवर बाहेर आलाय.

 

आजारावर उपचारासाठी त्याला 14 दिवसांची संचित रजा मंजूर झाली आहे. आज सकाळी 11 वाजता संजय तुरूंगातून बाहेर आला.

 

त्यानंतर त्याने थेट मुंबईचा रस्ता धरला. दुपारी संजय दत्त आपल्या मुंबईतल्या घरी पोहचला. 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यापैकी त्याने अगोदर 18  महिन्याची शिक्षा भोगली होती उर्वरीत 3 वर्षांची शिक्षा संजय येरवडा तुरूंगात भोगत आहे.

close