तरुणीची छेड काढणार्‍यांना बदडले

October 1, 2013 5:02 PM1 commentViews: 2539

01 ऑक्टोबर : मुंबईमधल्या वांद्रे रेल्वे स्टेशनवर एका तरूणीची छेड काढणार्‍या काही गुंडांना प्रवाशांनी चांगलाच चोप दिलाय. ही तरूणी रोज बांद्र्याला एका क्लासला जाते. त्यासाठी ती रोज रात्री बांद्र्याहून प्रवास करते. काही गुंड आपली छेड काढत असल्याचं तिनं एका सेवाभावी संस्थेला कळवलं. त्यानंतर या एनजीओच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीनं त्या गुंडांना गाठलं. पण, हा प्रकार कळल्यानंतर स्टेशनवर प्रवाशांनीच त्या गुंडांना प्रसाद दिला. नंतर पोलिसांनी या गुंडांना ताब्यात घेतलं.

  • vikas

    no 1 tai

close