काँग्रेसचे खा.रशीद मसूद यांना 4 वर्षांचा तुरुंगवास

October 1, 2013 5:43 PM0 commentsViews: 533

rashid masud01 ऑक्टोबर : लालू प्रसाद यादव यांच्या पाठोपाठ आणखी एका नेत्यांची तुरूंगात रवानगी करण्यात आलीय. मेडिकल प्रवेश घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय आरोग्य मंत्री रशीद मसूद यांना दोषी ठरवत 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.

 

1989-1991 च्या दरम्यान रशीद मसूद आरोग्य मंत्री असताना देशभरात मेडिकल कॉलेजमध्ये त्रिपुरा कोट्यातून सात विद्यार्थ्यांना पदाचा दुरूपयोग करून अवैशरित्या प्रवेश दिला होता. या प्रकरणात मसूद दोषी सापडले होते. 19 सप्टेंबर रोजी याप्रकरणी कोर्टाने रसूद यांना दोषी ठरवलं होतं.

 

आज या प्रकरणाचा कोर्टाने निर्णय दिला. मसूद यांच्यासोबत आयपीएस अधिकारी गुरूदयाल सिंग आणि आयएएस अधिकारी ए. के. रॉय यांनाही प्रत्येकी 2 आणि 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. या शिक्षेमुळे आता मसूद यांची खासदारकी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार रद्द होणार आहे.

close