गोपालस्वामींना केंद्रानं फटकारलं

February 2, 2009 11:27 AM0 commentsViews:

2 फेब्रुवारीमुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी आणि निवडणूक आयुक्त नवीन चावला यांच्या वादात केंद्रानं आता नवीन चावला यांची बाजू घेतली आहे. गोपालस्वामी यांनी आपलं काम करावं आणि राजकीय व्यक्तींप्रमाणे बोलणं थांबवावं अशा शब्दात केंद्रीय कायदामंत्री एच. आर. भारद्वाज यांनी गोपालस्वामींना खडसावलं आहे. एवढंच नाहीतर तर गोपालस्वामी 20 एप्रिलला रिटायर झाल्यानंतर नवीन चावलाच मुख्य निवडणूक आयुक्त होतील यावरही भारद्वाज यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.ठसहकार्‍यांवर टीका करण्याचा मुख्यनिवडणूक आयुक्तांना घटनात्मक अधिकार नाही. ते त्यांचे बॉस नाहीत. ते फक्त प्रशासकीय प्रमुख आहेत. त्यांना सारखाच पगार मिळतो. नवीन चावलाही सध्या सगळ्यात वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तपदी सगळ्यात वरिष्ठ व्यक्तीची नेमणूक करण्याचं धोरण याहीपुढे सुरू राहील." असं कायदामंत्री हंसराज भारद्वाज यांनी स्पष्ट केलं.

close