कोल्हापुरात वकिलांचं ‘कामबंद’सुरूच

October 1, 2013 6:00 PM0 commentsViews: 89

01 ऑक्टोबर : कोल्हापूरमध्ये मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ व्हावं या मागणीसाठी गेले 32 दिवस 6 जिल्ह्यांतल्या वकिलांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय. कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधूदूर्ग या 6 जिल्ह्यांत हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय. अनेक खटले प्रलंबित आहेत. तर अनेक जणांना जामीनच मिळत नाहीये. गेल्या महिन्याभरात या वकिलांनी अनेक आंदोलन केलंी. कोल्हापूर बंद, महागणपतीला साकडं घालून महाआरती, रॅली अशा अनेक प्रकारे आंदोलन सुरू आहे. तरीही खंडपीठाबाबत अजूनही ठोस असा निर्णय झालेला नाही.

close