डॉकयार्ड इमारत कशी कोसळली?

October 1, 2013 6:42 PM0 commentsViews: 255

01 ऑक्टोबर : मुंबईतील डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला. मागिल आठवड्यात गुरूवारी पहाटे ही इमारत पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली. पण ही इमारत कोसळली कशी? नेमका अपघात कसा झाला आणि ही घटना का घडली याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन शक्यता व्यक्त केल्या आहे.

1) इमारतीचा तळमजला बेकायदेशीरपणे मंडप कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आला होता. बेकायदेशीरपणे बांधकाम करताना त्यानं बीम आणि कॉलम हलवले. यामुळं इमारत कमजोर झाली असावी.
2) इमारतीच्या जवळच इस्टर्न एक्सप्रेस हायवेचं काम सुरू होत. या वेळी पायलिंग करताना हादरे बसून ही 32 वर्षं जुनी इमारत खिळखिळी झाली असावी.
3) 1970 मध्ये जेव्हा ही इमारत बनवली गेली तेव्हा सर्रासपणे निकृष्ट दर्जाचं सिमेंट वापरलं गेलं. या इमारतीच्या बाजूला बांधकामाच्या पुनर्निर्माणाची काम सुरू आहेत. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला असावा
 

close