कारची धडक कॅमेर्‍यात कैद

October 1, 2013 6:49 PM0 commentsViews: 6030

01 ऑक्टोबर : नेरुळमध्ये 5 ऑगस्ट रोजी दोन गाड्यांच्या झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार झाला होता. तर पाच जण जखमी झाले होते. होंडा सिटीनं ओमनी गाडीला धडक दिल्यानं हा अपघात झाला होता. या अपघातात शेखर गायकवाड यांचा मृत्यू झाला. पण सुसाट वेगाने विना परवाना गाडी चालवणार्‍यांना मात्र पोलिसांनी अटक करुन सोडून दिलं असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला. या अपघाताचं सीसीटिव्ही फुटेज आयबीएन लोकमतच्या हाती लागलंय. पोलीस या अपघाताला जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्यात टाळाटाळ करतायत असा आरोप मृतांच्या नातेवाईकंानी केलाय.

close