मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात विदर्भवाद्यांचा गोंधळ

October 1, 2013 8:58 PM0 commentsViews: 461

cm amravti program01 ऑक्टोबर :अमरावतीत वसंतराव नाईक जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोरच विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला.

 

अमरावती इथल्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विदर्भवादी नेत्यांनी वेगळा विदर्भ झालाच पाहीजे अशा घोषणा दिल्या.

 

मुख्यमंत्री सभेत बोलायला उभे राहताच मावळा संघटनेचे प्रमुख बाळासाहेब कोराटे यांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या. विश्रामगृहाबाहेरही जनसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री निघून जाताच सर्व कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.

close