तटकरेंकडे एवढी बेहिशेबी मालमत्ता आली कुठून?:कोर्ट

October 1, 2013 9:14 PM1 commentViews: 1684

coart on tatkare01 ऑक्टोबर : जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तसंच राज्य सरकारला हायकोर्टाने फटकारलंय. तटकरे कुटुंबीयाकडे एवढी मालमत्ता कुठून आली, असा सवालही कोर्टाने विचारलंय.

 

तटकरे यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने राज्य सरकारलाही फटकारलंय. तसंच 3 महिन्यांच्या आत तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेशही हायकोर्टाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.

 

रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुनील तटकरे यांनी बोगस कंपन्या थाटून आपल्या कुटुंबीयांच्या नावे हजारो एकर शेकडो एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी आपल्या जनहित याचिकेत केला आहे.
तटकरे यांच्यावरचे आरोप
– मुलगा, मुलगी, सून आणि सहकार्‍यांच्या नावे अनेक कंपन्या स्थापन केल्या
– बोगस कंपन्या स्थापन करून रायगड जिल्ह्यात शेकडो एकर जमीन लाटली
– कंपन्यांचं बॅलन्सशिट तपासल्यानंतर मनीलाँड्रिंगचा झाल्याचं आढळलं

 

टकरेंच्या कंपन्यांमध्ये अफरातफर ?

मल्टीव्हेंचर ऍग्रो & इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी- 20 मार्च 2009 : 1,75,000 शेअर्सची प्रत्येकी 100 रु. दरानं विक्री- 31 मार्च 2010 : सहयोगी कंपन्यांनी प्रत्येकी 10 रु. दरानं केली शेअर्सची खरेदी- शेअर होल्डर्सची नावं जाहीर करण्यात आली नाहीत- शेअर्स खरेदी-विक्रीमध्ये कंपन्यांना 3 कोटी रु. नफा (100 रु. शेअरची 10 रु.ना खरेदी)- 2009 : 4 कोटी 85 लाख 95 हजार 645 रु. कर्ज दिलं, पण कोणाला? – एवढं मोठं कर्ज दिल्यावरही व्याजाची रक्कम बॅलन्सशिटमध्ये का नाही?

मल्टीव्हेंचर इस्टेट्स प्रा. लि. – 10408 शेअर्सची प्रत्येकी 1806 रु. दरानं दोन शेअरहोल्डर्सना विक्री- कंपनीच्या पहिल्याच वर्षात इतक्या महाग दरानं शेअर्स कुणी खरेदीकेले?- स्थापनेच्या वेळी कंपनीचं भागभांडवल होतं 10 लाख रु.- स्थापनेच्या वेळेस अनिकेत आणि आदिती तटकरे हे दोघेच होते संचालक- 2 सप्टेंबर, 2008 : दोघांनीही दिला संचालकपदाचा राजीनामा- 1 सप्टेंबर, 2008 : गिरीष आमोणकर बनले कंपनीचे संचालक- बॅलन्सशिटमध्ये वार्षिक टर्नओव्हरचा रकाना रिकामाच- बॅलन्सशिटमध्ये सहयोगी कंपनी आहे विनम्र युनिव्हर्सल ट्रेडर्स प्रा. लि.

विनम्र युनिव्हर्सल ट्रेडर्स कंपनी प्रा. लि.- मल्टीव्हेंचर इस्टेट्स प्रा. लि. कंपनीमध्ये 46 % गुंतवणूक– विनम्रच्या बॅलन्सशिटमध्ये दाखवलेले आर्थिक व्यवहार संशयास्पद- कंपनीचं स्थापनावर्ष – 2008- स्थापनेच्या वेळी कंपनीचं भागभांडवल 1 लाख रु.- पहिल्याच वर्षात घेतलं 3,520 कोटीचं कर्ज – हे कर्ज विनातारण स्वरुपाचं- कर्जाचा स्त्रोत कंपनीने जाहीर केलेला नाही- एक लाख रु. भागभांडवलावर 3,520 कोटीचं कर्ज कसं मिळालं?- कर्जाची परतफेड, व्याजाचे हप्ते बॅलन्सशिटमध्ये नाहीत

 

2009 : कंपनीने दाखवला 500 कोटींचा तोटा – तोटा होत असताना इतर कंपन्यांना जमीन खरेदी आणि गुंतवणुकीसाठी दिले पैसे- यापैकी एकाही कंपनीनं सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, ऍडव्हान्स टॅक्स भरल्याची माहिती बॅलन्सशिटमध्ये नाहीनेक्स्ट टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि.

 

– 31 मार्च, 2006 : 1,90,575 शेअर्सची प्रत्येकी 390 रु. दरानं विक्री- 15 मे, 2010 : सर्व शेअर्सची प्रत्येकी 11 रू. दरानं केली खरेदी- ही शेअर्स खरेदी केली नेक्स्ट कंपनीच्याच 3 सहयोगी कंपन्यांनी – व्यवहारात नफा – 7 कोटी 43 लाख 24 हजार 250 रु. (390 रु. चा शेअर 11 रु. नं खरेदी केला)- सहयोगी कंपन्या : : मल्टीव्हेंचर फायनाशियल सव्हिर्सेस प्रा. लि. : मल्टीव्हेंचर प्रॉपर्टीज प्रा. लि.: मल्टीव्हेंचर फिशरीज ऍण्ड मेरीटाईम प्रा. लि.ब्ल्यू फॉरेस्ट ऍग्रो इस्टेट प्रा. लि.- 86 लाख 89 हजार 550 रुपयांचं विनातारण कर्ज घेतलं- किरण केशव सारंगे : 2 वर्ष संचालकपदी- किरण सारंगे हा तटकरे यांच्या कामगाराचा मुलगा- कंपनीने घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी हप्ते भरल्याची माहिती ऑडिटमध्ये नाही- पैशांच्या देवाणघेवाणीसाठी केवळ कागदावर दाखवलं कर्ज?माझदा कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि.

 

– 30 सप्टेंबर, 2011 : मल्टीव्हेंचर प्रॉपर्टीज प्रा. लि. चे 500 शेअर्स – मल्टीव्हेंचर मध्ये अनिकेत तटकरे संचालकपदी- म्हणजेच माझदा कंपनीचं 33 % शेअरहोल्डींग अनिकेत यांच्या कंपनीकडे- माझदा कन्स्ट्रक्शनचा मुंबईत कंबाला हिल इथे ऑर्बिट ग्रुपच्या मदतीने पुनर्विकासाचा प्रकल्प सुरु- याच प्रकरणात किरीट सोमय्या यांनी केलेत आरोप- 50 हजार रु. गुंतवून 100 कोटी रु. नफा मिळवल्याचा आरोप

  • Sham Dhumal

    जलसंपदा खात्यात पाण्यासारखा पैसा ओतूनही जनता पाणी पाणी
    करत आहे. ही संपत्ती कुठेतरी जमा झाली असेल ना?

close