लिटील चॅम्पस महाअंतिमफेरीसाठी सज्ज

February 2, 2009 11:27 AM0 commentsViews: 13

2 फेब्रुवारी मुंबईआपल्या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारे सारेगामापाचे लिटील चॅम्पस आता सज्ज झालेत महाअंतिमफेरीसाठी. सारेगामापा लिटील चॅम्पसची महाअंतिमफेरी रविवारी 8 फेब्रुवारीला अंधेरीतील राजे शहाजी क्रिडा संकुलात होणार आहे. या अंतिम फेरीत रत्नागिरीचा प्रथमेश लघाटे, लातूरचा रोहित राउत, पुण्याची आर्या आंबेकर, आळंदीची कार्तिकी गायकवाड आणि अलिबागची मुग्धा वैंशपायन हे पाच लिटील चॅम्पस आहेत. या पाचजणांपैकी अंतिम फेरीत कोण जिंकणार याकडे अख्खया महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कोणाला किती एसएमएस पडणार यावरही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता 8 फेब्रुवारीला या लिटील चॅम्पसमध्ये होणारी महाअंतिमफेरी रंगतदार होणार आहे.

close