‘साधना’चा बालकुमार अंक प्रसिद्ध

October 1, 2013 11:25 PM0 commentsViews: 131

01 ऑक्टोबर : दिवाळीच्या निमित्ताने बच्चेकंपनीला वैचारिक फराळ मिळावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून साधना तर्फे बालकुमार दिवाळी अंक प्रसिद्ध केला जातो. दरवर्षी विक्रीचे नवे रेकॉर्ड ब्रेक करणारा हा अंक आज प्रकाशित झाला. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा हातभार लागलेला हा साधनाचा शेवटचा अंक असला तरी हा वसा पुढे घेउन जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास सगळ्या टीमनं व्यक्त केलाय. लहान मुलांसाठी अनेक दिवाळी अंक तर प्रकाशित होतात. पण यामध्ये कमतरता होती ती प्रेरणादायी आणि वैचारिक गोष्टींची.. नेमकी हीच गोष्ट टिपली डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी. साधनाच्या मागे साने गुरुजी हे नाव होतं. त्यामुळेच बच्चेकंपनीसाठी काही तरी करणं हे ध्येयही होतं. यातुनच पाच वर्षांपुर्वी साधनाचा बालकुमार दिवाळी अंक साकारण्यात आला. पहिल्याच वर्षी या अंकाने विक्रीचा एक नवा उच्चांक स्थापन केला. आणि पुढच्या प्रत्येक वर्षात त्याचे रेकॉर्ड मोडत गेला.असं असलं तरी अंक विकला गेला तो ना नफा ना तोटा या तत्वावरच. मुळ किंमत 25 रुपये असणारा हा अंक बच्चेकंपनीसाठी मात्र अवघ्या 10 रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिला गेलाय.

 

close