नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊ- मुख्यमंत्री

February 2, 2009 12:31 PM0 commentsViews:

2 फेब्रुवारी गडचिरोलीगडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयात शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गृहमंत्री जयंत पाटील श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद झाली. या परिषदेत नक्षवाद्यांचा हा हल्ला आमच्यासाठीही मोठा आघात आहे. तरीही नक्षलवाद्यांच्या कारवायांना आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात नक्षवाद्यांचे हल्ले कमी झाले आहेत. गडचिरोली, गोंदीया याभागात नक्षलवाद्याचा प्रभाव जास्त होता पण गेल्या तीन-चार वर्षात नक्षलवाद्यांच्या कारवाया कमी झाल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री पी चिदंमबरम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही महाराष्ट्राचा आढावा सादर केला . आतापर्यंत सरकारने विविध योजनेद्वारे 333 कोटी रुपये या नक्षलवादी भागात खर्च केले गेले आहेत असंही त्यांनी सांगितलं. तातडीची मदत न मिळाल्यामुळे जखमी पोलिसांवर उपचार होऊ शकले नाही. पण आता या संपूर्ण हल्ल्याची चौकशी केली जाईल असं ते म्हणाले. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यात रविवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात जोरदार चकमक झाली होती. या चकमकीत एका पोलीस सब इन्स्पेक्टरसह पंधरा पोलीस शहीद झाले होते. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या मरकेगाव जंगल परिसरात हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांनी रोड रोलर आणि ट्रॅक्टर जाळले होते, त्याचा तपास करण्यासाठी पोलीस जात असताना पोलिसांवर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.

close