MCAच्या निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात

October 2, 2013 2:17 PM0 commentsViews: 810

sharad pawar4402 ऑक्टोबर : मुंबई क्रिकेट असोसियशनच्या निवडणुकीचे पडघम वाजायला आता सुरुवात झालीये. 18 ऑक्टोबर रोजी एमसीएची निवडणूक रंगणार आहे. यासाठी बाळ म्हाडदळकर गटानं आपल्या पॅनेलची घोषणा केलीये. या गटानं बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.

 

तर या पॅनेलचे एके काळचे सदस्य रत्नाकर शेट्टी यांचा मात्र पत्ता कापला गेलाय. म्हाडदळकर गटाकडून शरद पवार आणि एमसीएचे सध्याचे अध्यक्ष रवी सावंत एकत्र निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुखांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत रवी सावंत यांनी शरद पवारांच्या उमेदवाराला पराभूत करत अध्यक्षपदाची खुर्ची पटकावली होती.

 

त्यामुळे पवार आणि सावंत एकाच गटात बघून आता चर्चा रंगायला सुरुवात झालीये. एमसीएनं रत्नाकर शेट्टींविरोधात केलेल्या कारवाईनंतर या गटानं प्रोफेसर शेट्टींचाही पत्ता कापलाय. तर रत्नाकर शेट्टी आपलं एक नवं पॅनेल तयार करतील अशी शक्यता वर्तवली जातेय.

close