दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना अटक कधी?

October 2, 2013 5:51 PM0 commentsViews: 246

02 ऑक्टोबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी आज बुधवारी दाभोलकर यांची मुलगी आणि अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर आणि ज्येष्ठ शेकाप नेते एन.डी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खुनाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी दोघांना सांगितलं. लवकरच प्रकरणाचा छडा लागणार आहे असं स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

close