तेलगीला 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

February 2, 2009 1:18 PM0 commentsViews: 2

2 फेब्रुवारी मुंबईस्टॅम्प घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगी याच्यावर मुंबई सेशन कोर्टात सुनावणी झाली. यात तेलगी आणि त्याच्या तीन साथीदारांना दोषी ठरवण्यात आलं आहे. या सर्वांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तेलगी आणि त्याच्या साथीदारांवर बोगस स्टॅम्पप्रकरणी मुंबई सेशन कोर्टात 3 खटले सुरू होते. या खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली. तेलगीविरुद्ध तीन खटल्याचा निर्णय झाला असून 340,341,342 या प्रकरणात तेलगी आणि त्याचे तीन साथीदार दोषी आढळले आहेत.या खटल्यामध्ये तेलगीला सवार्त जास्त पाच वर्षाची शिक्षा तसंच वेगवेगळया सेशनमध्ये झालेल्या शिक्षेमध्ये त्याला दंडही ठोठावण्यात आला आहे.

close