पाक सैनिकांनी घुसखोरी करून गावावर केला कब्जा?

October 2, 2013 6:09 PM0 commentsViews: 1163

pak attack02 ऑक्टोबर : संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट होऊन दोन्ही नेते मायदेशी परतून काही तास उलटले नाही तोच पाकने आपली जागा दाखवून दिलीय. पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवरच्या भारतातल्या शाला भाटा नावाच्या एका ओसाड गावावर कब्जा केल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

पण,पाकिस्ताननं कुठल्याही गावावर कब्जा केला नाही तर घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलंय. पाकिस्तानच्या सैन्याच्या मदतीनं 30 ते 40 अतिरेकी या गावात घुसले आहेत.

 

पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय जवानांनी गोळीबार सुरू केलाय. पाकिस्तानचे जवान रिकाम्या घरांचा आसरा घेऊन गोळीबार करत आहेत. अजूनही हा गोळीबार सुरू आहे. 23 सप्टेंबरच्या रात्री पाकिस्तानच्या जवानांनी घुसखोरी केल्याचं कळतंय.

close