‘सिंचन प्रकरणी चितळे समिती दोषी ठरवण्यासाठी नाही’

October 2, 2013 9:53 PM3 commentsViews: 700

02 ऑक्टोबर : सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यू टर्न घेतलाय. चितळे समिती कुणाला दोषी ठरवण्यासाठी नाही तर सिंचनाची पुढची दिशा काय असावी हे ठरवण्यासाठी आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावर वादळ उठल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या चौकशीसाठी माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

 

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय एसआयटी SIT नेमण्यात आली. पण या चौकशी समितीला सिंचन घोटाळ्यातल्या राजकारणी आणि अधिकार्‍यांची चौकशी करण्याचा अधिकारंच देण्यात आलेला नाही. या समितीला नेमून दिलेल्या कार्यकक्षेत घोटाळ्याचा आरोप असलेले अधिकारी किंवा राजकारण्यांच्या चौकशी आणि उलट तपासणीबाबतचा कुठलाही मुद्दा नाहीअसं खुद्द समितीचे अध्यक्ष माधव चितळे यांनी स्पष्ट केलं होतं. माधव चितळे समितीचा म्हणजेच एसआयटीबाबतचा जीआर जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हाच सिंचनाच्या कामांमधली प्रशासकीय अनियमितता तपासून अहवाल देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते, हे सहज स्पष्ट होतं.
चितळे समितीचं काम काय?

- सिंचनाचे क्षेत्र किती आहे, कितीने वाढले तसेच सिंचनाचे क्षेत्र कमी राहण्याची कारणे तपासणे

- प्रकल्पांच्या किंमती का वाढल्या, प्रकल्पांना विलंब का झाला याची कारणमीमांसा करणे

– उपसा सिंचन योजनांची उपयुक्तता वाढवण्यासाठी उपाययोजना सूचवणे

- चौकशीत अनियमितता आढळल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करणे आणि योग्य कारवाई सुचवणे

 • Sham Dhumal

  चितळे समिती दोषींना वाचविण्यासाठी आहे का?
  गुन्हेगारांना वाचविणे हेच प्रमुख ध्येय सरकारने ठरविले आहे का?

 • Pushkaraj Patil

  मग मुख्यमंत्र्यांनी सिंचन घोटाळ्याची जबाबदारी कोणाची आहे आणि माहित नसेल तर ते शोधण्यासाठी काय केले ते सांगावे, नाहीतर चितळे समिती जेंव्हा उपाययोजना सुचवेल त्यात घोटाळा नाही होणार याची काय guarantee

 • Sachin Nalawade

  समित्या कशेया साठी असतात ते लोकांना चांगले माहित आहे साहेब

close