चूक सुधारली, 14 वर्षानंतर त्याने हुंडा परत केला !

October 2, 2013 9:06 PM1 commentViews: 1582

मुजीब शेख,नांदेड
02 ऑक्टोबर : नांदेडमधल्या एका तरुणांनं इतरांप्रमाणंच लग्नात सासरकडून हुंडा घेतला. पण या गोष्टीचा 14 वर्षानंतर त्याला पश्चाताप झाला आणि त्यानं हुंडा परत करण्याचा निर्णय घेतला. पण सासरच्या मंडळींनी हा हुंडा पर घ्यायला नकार दिल्यानं हा पैसा या तरुणानं सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेला दिलाय.

लोहा तालुक्यातल्या माळाकोळी गावातल्या जालिंदर कागणेचं 1999 मध्ये लातूर जिल्ह्यातल्या संगीताशी लग्न झालं. लग्नात त्यांनी 1 लाख रुपये हुंडा घेतला. लग्नाला 14 वर्षं लोटली. एके दिवशी मित्रांसह स्त्री भ्रूण हत्या आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विषयावर चर्चा करताना जालिंधरचं मन हेलावलं. आपण हुंडा घेऊन चूक केलीय असं त्याला वाटू लागलं आणि त्यानं हुंड्याची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला.
जालिंदरच्या निर्णयाला घरच्यांनीही होकार दिला. त्याचबरोबर दुसर्‍या मुलाच्या लग्नात हुंडा घ्यायला नकार दिला. पण जालिंदरच्या सासरच्या मंडळींनी मात्र हुंडा परत घ्यायला नकार दिला. हा पैसा समाजकार्यासाठी द्यावा असं दोन्ही कुटुंबानं ठरवलं. त्यातूनच गांधी जयंतीच्या दिवशी सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेला ही एक लाख रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबानं घेतला.

  • pranita mokashe

    vachun asa vatala ki kharach shikshanach fayda kotetri hotoy ya vyaktila manacha mujra….. god bless you and ur family

close