सिनेमाची शंभरी थीम पार्कमध्ये !

October 2, 2013 10:16 PM0 commentsViews: 403

02 ऑक्टोबर : ठाणे शहरात आता थीम पार्क उभारण्यात येणार आहे.जुनं ठाणं, चित्रपटसृष्टीची शंभर वर्ष अशा वेगवेगळ्या थीम्स घेत कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि डॉ.असीम गोकर्ण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका हे थीम पार्क साकारणार आहे. ठाण्यातल्या उद्यानांची दुरवस्था रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं आता उद्यानांसाठी सर्वंकक्ष आराखडा तयार केला आहे. यासाठी पालिकेनं उद्यान विभागासाठी नितीन देसाईंना सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. उद्यान विकासाच्या पहिल्या टप्प्यात लोकमान्य नगर उथल्या अप्पासाहेब पवार उद्यानात भारतीय चित्रपटसृष्टीचा शंभर वर्षांचा इतिहास मांडला जाणार आहे. तर इतर उद्यानांमध्ये बारा बलुतेदारांचं गाव, जुनं ठाणं असे विविध विषय साकारण्यात येणार आहेत.

close