शंभर वर्ष जुन्या इमारतीत राहणार्‍यांचा जीव टांगणीला !

October 2, 2013 8:23 PM0 commentsViews: 438

उदय जाधव, मुंबई
02 ऑक्टोबर : मुंबईतल्या धोकादायक इमारतीचा प्रश्नं अतिशय गंभीर बनलाय. त्यापैकीच एक आहे कुंभारवाड्यातील शंभर वर्ष जुनी पानवाला इमारत….या बिल्डींगमध्ये शंभर कुटुंब जीव धोक्यात घालून राहत आहे. अतिशय कमी जागेत असलेल्या या इमारतीच्या विकासासाठी मालक, बिल्डर आणि म्हाडा कुणीही पुढे येत नाहीये. गरिबीत दिवस काढणार्‍या येथील रहिवाश्यांना कोणाचाच आधार नाहीये.

 
कुंभारवाड्यातील अतिशय कमी जागेत उभी असलेली ही पानवाला इमारत…शंभर वर्ष जुन्या या इमारतीमध्ये शंभरहुन अधिक रहिवासी रहातात. त्यापैकीच एक आहेत मिनाक्षी कोंडेकर…गेली अठ्ठावन वर्ष ते या बिल्डिंगमध्ये रहातात. त्यांच्यासह सर्व रहिवाशी या बिल्डिंगमध्ये जीव धोक्यात घालून रहातात. गरिबीत दिवस काढणार्‍या येथील रहिवाश्यांकडे, इमारत मालक, बिल्डर आणि म्हाडा कुणीच लक्ष देत नाहिये.

 
अतिशय कमी जागेत असलेल्या या धोकादाय इमारतीचा विकास करुन, विकासकांना कोणताच फायदा होणार नसल्याने पानवाला बिल्डींगकडे दुर्लक्ष झालंय. त्यामुळे हातावर पोट भरणार्‍या येथील रहिवाश्यांना कोणाचाच आधार नाहीये.

close