काँग्रेस-राष्ट्रवादीमधला जागावाटपाचा वाद चिघळला

February 3, 2009 6:51 AM0 commentsViews:

3 फेब्रुवारी, मुंबईलोकसभेच्या जागावाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुंबईत बैठक झाली. यात काँग्रेसने गेल्या वेळच्याच 27- 21 या फॉर्म्युलावर ठाम रहाण्याची भूमिका घेतली. दोन्ही काँग्रेसनी निम्म्या निम्म्या जागा लढवाव्यात असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने ठेवण्यात आला, मुंबईतल्या सहा जागांपैकी दोन जागांची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. त्यामुळे जागा वाटपाचा वाद चिघळला आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आर.आर.पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सचिन अहीर उपस्थित होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख हे नेते आले होते.

close