विदर्भात पावसाचा कहर,7जणांचा मृत्यू

October 4, 2013 3:07 PM0 commentsViews: 987

vidharbha rain04 ऑक्टोबर : विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागाला गुरूवारी पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. विदर्भात अनेक ठिकाणी वीज कोसळून 7 जण ठार झालेत. सेलू तालुक्यातल्या केळझरमध्ये अंगावर वीज पडल्यानं एका तरूणीचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झालंय.

 

या पावसाचा फटका सोयाबीन पीकाला बसलाय. सोयाबीन काढणीवर आलं असतानाच पाऊस आल्यानं शेतकर्‍यांना फटका बसलाय. पावसामुळे आधी मुग आणि उडीद पीक हातचं गेलं. सोयाबीन हे नगदी पीक असल्यानं आता तेही हातचं गेलं तर करायचं काय असा प्रश्न शेतकर्‍यांना पडलाय.

 

परतीच्या पावसामुळे सध्या ऊनपावसाचा खेळ सुरू आहे. नदीनाल्यांना पुराचा फटका बसतोय. दरम्यान, लोअर वर्धा प्रकल्पाचे 13 तर बोर प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. ओडीशा आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्यामुळे विदर्भात जोरदार पाऊस होतोय. येत्या 24 तासात नागपूर वेधशाळेनं अतिवृष्टीचा इशारा दिलाय. परतीचा पाऊसही लांबण्याची शक्यता आहे.

close